मकरसंक्रांत ( MakarSankrant 2023) खास तिळाचा सण मानला जातो. यादिवशी खास तिळाचे लाडू, वड्या वाटल्या जातात. घरोघरी स्वयंपाकघरात तिळगुळ करण्यासाठी गडबड सुरू असते. सामान्य माणूस असो अथवा सेलेब्रिटी मात्र सण-समारंभांचे अप्रूप दोघांना देखील असते. त्यामुळे सध्या अनेक सेलेब्रिटी सुद्धा उत्साहात मकरसंक्रांत साजरी करत आहेत. दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याने देखील अगदी अनोख्या पद्धतीने आपल्या चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पतंगामागे धावणाऱ्या बालकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; ऐन सणात काळाने घातला घाला
सचिन तेंडुलकर सोशल मीडियाचा कायम प्रभावीपणे वापर करत असतो. विविध फोटो व व्हिडीओ शेअर केल्याने तो चर्चेत देखील असतो. अशातच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर सचिन तेंडुलकरने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने तिळाचे लाडू बनवले आहेत. या व्हिडिओसोबत त्याने ‘तिळगुळ बनवण्याचा माझा पहिलाच प्रयत्न’ असे कॅप्शन टाकले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
भारत-श्रीलंका वन डे सामन्यामध्ये किंग कोहलीचा ‘विराट’ शो; ठोकले ७४ वे आंतरराष्ट्रीय शतक
या व्हिडीओमध्ये सचिन आपल्या स्वयंपाकघरात उभा राहून तिळगुळ बनवत आहे. सोबतच तो तिळगुळ कसे बनवायचे याची रेसिपी देखील अत्यंत रंजक प्रकारे सांगत आहे. विशेष म्हणजे व्हिडिओच्या शेवटी सचिन आपल्या हातांनी बनवलेल्या लाडूची चव चाखत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. यावर नेटकऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रतिक्रिया देत सचिनचे कौतुक केले आहे.
पोलीस चौकशींनंतर दुसऱ्याच दिवशी उर्फीने शेअर केले बोल्ड फोटो; चर्चाना उधाण