मुंबई । मागच्या अनेक दिवसापासून सर्वजण पावसाची वाट पाहत होते अखेर काल या पावसाने हजेरी लावली आहे. बहुप्रतिक्षित पाऊस काल अखेर राज्यात दाखल झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये देखील काल मुसळधार पाऊस झाला आहे. (Mumbai rain Latest News)
OPPO A78 4G । Oppo चा नवीन फोन लवकरच होणार लॉंच, ‘हे’ असतील धमाकेदार फिचर; जाणून घ्या सविस्तर
या पावसामुळे मुंबईकरांमध्ये (Mumbai) आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील नागरीक उकाड्याने हैराण झाले होते. त्यामुळे त्यांची आता उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र पहिल्याच पावसाने मुंबईकरांची चांगली तारांबळ देखील उडवून दिली.
Hero पासून TVS पर्यंत ‘या’ शक्तिशाली मोटरसायकल खरेदी करा फक्त 80 हजारांमध्ये; जाणून घ्या अधिक..
पहिल्याच पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलं आहे. बऱ्याच ठिकाणची काही धक्कादायक दृश्य देखील समोर आली आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे जोरदार पाणी वाहत होते यावेळी आपल्या गाड्या वाचविण्यासाठी लोकांनी रस्सीने बांधून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याचबरोबर एका महिलेला वाहून जाण्यापासून वाचवण्यात आलं. याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भीषण अपघात! ट्रकने दुचाकीला चिरडले, बापलेकाचा जागीच मृत्यू
त्याचबरोबर पहिल्याच पावसामुळे पाणी साचून मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला जातोय. आता वर्षा गायकवाड यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत ट्विट करत त्या म्हणाल्या की, ” मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. धादांत खोटं बोलणारं हे सरकार आणि यांचे अधिकारी!
ब्रेकिंग! पुण्यातील वाकडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी
“अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचलं आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? उत्तर द्या” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 24, 2023
पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी… pic.twitter.com/CXaJS3Ndmc