सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. गिरपीठीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतपिकांमध्ये कांदा आणि द्राक्षे याचे तर अतोनात नुकसान झाले आहे. कांदा अक्षरश शेतात सोडून गेला आहे तर द्राक्ष झाडावरच सडली आहेत.
अजित पवार भाजपसोबत जाणार? भास्कर जाधव म्हणाले…
दरम्यान, द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांमध्ये रविवारी संध्याकाळी गारपीट आणि अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे द्राक्ष बागेतील द्राक्ष अक्षरश सडली आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सलग तीन-चार दिवस पाऊस पडत होता त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राजकीय घडामोडींचा वेग! पवारांसोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेणार
शेतकऱ्यांना द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील पीक कसे घ्यावे यासह अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहत आहेत. संपूर्ण कर्जमाफी करत पुढील पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत करावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत.
मोठी बातमी! IPL चालू असतानाच क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये वाढ