सध्याचं युग इंटरनेट, सोशल मीडियाचे (internet, social media) आहे. सोशल मीडिया हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. अनेक जण दिवसातील कित्येक तास केवळ सोशल मीडियावर घालवतात. फेसबुक, इंस्टाग्राम या सारख्या प्लॅटफॉर्मवरून मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्या आयुष्यात काय चालले आहे, याची माहिती मिळते. मात्र कधीकधी सारख्या त्याच त्याच गोष्टी नको वाटतात जसे की, फेसबुकवर लोकांच्या बर्थडेचे नोटिफिकेशन सतत येतात.
भीषण अपघात! दोन डॉक्टर महिलांसह एकचा जागीच मृत्यू
फेसबुकवर सतत बर्थडेचे नोटिफिकेशन येत असल्यामुळे अनेकजण त्रस्त असतात. त्यामुळे आता तुम्हाला देखील याचा कंटाळा आला असेल तर आम्ही काही टिप्स सांगत आहोत त्यानुसार तुम्ही हे नोटिफिकेशन बंद करू शकता.
“…त्यावेळी यांची दातखिळी बसली होती का? अजित पवारांचा हल्लाबोल
- मोबाईलमध्ये पहिल्यांदा तुमचा प्रोफाईल फोटो किंवा आयकॉन निवडा.
- त्यांनतर सेटिंग्ज आणि प्रायव्हसीवर जा. नांतर प्रोफाइल विभागाच्या टाॅपवर प्रोफाइल सेटिंग्ज निवडा.
- यांनतर नोटिफिकेशन सेटिंग्जवर जा. त्या ठिकाणी वाढदिवस हा पर्याय दिसेल.
- त्यांनतर फेसबूक टॉगलवर नोटिफिकेशन बंद करा असा पर्याय दिसेल तो पर्याय निवडा.