Taarak Mehta Ka Ooltah Chashma । तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मागच्या पंधरा वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यामधील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक प्रेक्षक कलाकारांना भरभरून प्रेम देतात. मात्र या पंधरा वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक कलाकारांनी या मालिकेतून निरोप घेतला होता.
धक्कादायक! चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार, एका पोलिसासह चार जणांचा बळी
त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत होते. आपला आवडता कलाकार मालिकेत नसल्याने प्रेक्षक देखील ही मालिका पाहत नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता प्रेक्षकांची आवडती पात्र मालिकेत परत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashma)
मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच प्रसूती रजेवर गेलेली दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वाकानी मालिकेत परत येणार असणाऱ्या ज्या चर्चांवर निर्माते असिद मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना असिद मोदी म्हणाले, असे अनेक कलार आहेत कलाकार आहेत ज्यांना आपण विसरू शकत नाही त्यामधील एक म्हणजे दया भाभी उर्फ दिशा वाकानी त्यांनी या मालिकेच्या माध्यमातून अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले आणि त्यांना खळखळून हसवले आहे. यामुळे चाहते देखील त्यांच्या परतीची वाट पाहत आहेत. आणि मी तुम्हा सर्वांना वचन देतो की दिशा वाकानी लवकरच तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये परत येईल. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
Sharad Pawar । … तर राज्यात सत्तांतर होईल; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
सध्या त्यांच्या वक्तव्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दिशा वाकानी म्हणजे दयाबेन खरंच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत येणार का याबाबत आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.