TMKOC आता मोठ्या पडद्यावर, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा!

मुंबई | तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) ही मालिका अनेकांची आवडती मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील अनेक पात्रांचे GIF आणि मीम्स सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड वापरले जातात. नुकताच या मालिकेचे निर्माते असिद मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.

खळबळजनक घटना! धावत्या रेल्वेत प्रवाशाला पेटवले

तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) मालिका लवकरच मोठ्या पडद्यावर येणार असल्याची घोषणा आसिद मोदी यांनी केली आहे. आता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या चाहत्यांना या मालिकेचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

“तू चीज बडी हैं मस्त मस्त…”, गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; पाहा Vide

मागील वर्षी निर्मात्यांनी या मालिकेचं कार्टून व्हर्जन (Cartoon version) तयार केलं होत. तसेच ‘रन जेठा रन’ हा गेमदेखील लाॅन्च केला होता. या दोन्ही कल्पना प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. त्यामुळेच निर्माता असिद मोदींनी यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी त्यांची ही कल्पना सांगितली.

माणसाने चालत्या मेट्रोतून मारली उडी, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

15 वर्षानंतरदेखील प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड प्रेम करत आहे. जेठा, बबिता, पोपट ही सगळी पात्र आता लोकांना त्याच्या जवळची वाटत आहेत. त्यामुळेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचं एक विश्व निर्माण करावं असा माझा विचार आहे. काहीकाळानंतर TMKOC ची अॅनिमेटेड फिल्मदेखील येणार असल्याचं आसिद मोदी यांनी सांगितलं

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *