
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आज सकाळी ११ वाजता राजभवनावर होणार आहे. पहिल्या टप्प्यामंडे मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटी आणि त्याचबरोबर शिंदे गटातील दादा भुसे,गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत, शंभुराज देसाई, बच्चू कडू इत्यादींचा समावेश होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिन्याहून अधिक कालावधी झाला असून ( Eknath Shinde) राज्यात अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नव्हता. यामुळे अनेक नेत्यांकडून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवार-रविवारी दिल्ली दौऱ्यावर असताना भाजप पक्षेश्रेष्ठींशी याबाबत चर्चा केली.
दरम्यान, पहिल्या टप्प्यामध्ये भाजपच्या १२-१३ आणि शिंदे गटाच्या ९-१० मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपला एकूण २४ तर शिंदे गटाला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र मंगळवारच्या विस्तारानंतर काही महिन्यांनी उर्वरित जागा भरल्या जातील.