पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे ( Assembly Elections) वारे जोरदार वाहत आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे भाजप तर दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये तर प्रचारादरम्यान चांगलीच चढाओढ लागली आहे. आज संध्याकाळी सहा वाजता दोन्ही मतदार संघातील प्रचार संपणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही मतदारसंघात चांगलेच वातावरण तापल्याचे दिसत आहे.
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आज मैदानात उतरणार आहेत. मुख्यमंत्री दुपारी ते रोड शो करणार आहेत. दुपारी बारा वाजता समता भूमी या ठिकाणाहून रोड शोला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसकडून देखील दुपारीच रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आज प्रचाराचा धुराळा पाहायला मिळाणार आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा, तरुणांनी पैशाची उधळण करताच पोलिसांनी केला लाठीचार्ज
आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे. यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे. जर यावेळी कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कडक कारवाई देखील होणार आहे.
कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आता याबाबत २६ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्शवभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर अतंरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. याबाबत पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, २६ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २ मार्चला याबाबत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
आईच्या जिद्दीला सलाम! तान्ह्या बाळाला झोळीत टाकून तिने दिला बारावीचा पेपर