कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. कांदा विकून शेतकऱ्यांना फक्त १ रुपया मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहील आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्यासाठी सरकारनं प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
ब्रेकिंग! इंदूरमधील त्या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू
हे अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) कांदा विक्री केला त्याच ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फक्त आजचाच दिवस बाकी आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा शेतकरी आणत आहेत.
धक्कादायक! विधानसभेत पॉर्न व्हिडीओ पाहताना पकडला गेला भाजपचा आमदार; व्हिडीओ व्हायरल
दरम्यान बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा येत असल्याने कांद्याचे दर कमी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाली असून, कांद्याची कवडीमोल दरानं विक्री होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका देखील बसत आहे.
शेतकऱ्यांची चिंता काही थांबाणा! आज आणि उद्या राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता
अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे –
शेतकऱ्याने कांदा विकलेली पावती
सातबारा उतारा
बचत खाते पासबुक
हे सर्व कागदपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
‘मी खेळायला येत आहे’ IPL 2023 सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंतचा समोर आला एक व्हिडिओ