
भारतीय संस्कृतीत (Indian culture) अश्विन कृष्ण द्वितीया म्हणजेच वसुबारसपासून दिवाळी सणाला (Diwali festival) सुरुवात होते. वसुबारसनंतर (Vasubaras) धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपुजन, बलिप्रतिपदा, आणि भाऊबीज हे सण दिवाळीच्या पर्वात मोठ्या उत्साहात साजरे (celebrating) केले जातात. विशेष म्हणजे हिंदू धर्मातील (Hind) सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला मान आहे. खरतर दिवाळी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण. दरम्यान दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात वसुबारसपासून सुरू होते. या दिवशी गाय-वासराची (Cow-calf) पूजा केली जाते.
वसुबरारसेचं नेमकं महत्त्व काय?
भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस पासून सुरू होतो. दिवाळीचा हा पहिला दिवस गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. दरम्यान गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस (Vasubaras) या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. तसेच यावेळी गाईला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. आश्विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. खरं तर वसुबारस हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. गायी आणि वासरांना मान देण्यासाठी हा सण साजरा करतात.
विशेष म्हणजे या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंध आहे. कारण ज्या काळात अमृत किंवा जादुई अमृत शोधण्यासाठी देव आणि दानव समुद्रमंथन करून धडपडत होते. त्यावेळी दैवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली. त्यामुळे कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी संबंधित आहे. महत्वाची बाब म्हणजे दैवी प्राणी देखील भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवतार यांच्याशी संबंधित आहे.