मुंबई : आज रविवार 28 ऑगस्ट रोजी आशिया चषकात (asia cup 2022)भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संघात महामुकाबला होणार आहे. हा सामना आज संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान(IND vs PAK ) हे दोन्ही संघ तब्बल १० महिन्यांनंतर समोरासमोर येणार आहेत.
गेल्या वर्षी म्हणजेच टी-20 विश्वचष 2021 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता.
Twin Tower: जमीनदोस्त झालं नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स, लगतच्या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण
या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला.दरम्यान आत्ताच्या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या(Virat kohali) फॉर्मकडे असेल. दरम्यान या सामन्यासाठी विराट कोहली सध्या नेट्समध्ये प्रचंड मेहनत घेत असून या सामन्यात तो चांगली खेळी करेल, कर्णधार रोहित शर्माने(rohit sharma) व्यक्त केला आहे.
तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly)विराट कोहलीच्या मागील फार्मबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. गांगुली म्हणाला की, ”मला कोहलीला जुन्या अवतारात बघायचं आहे. तसेच या स्पर्धेत विराट चांगले प्रदर्शन करेन.” असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला आहे.
Sanjay Rathod: मोठी बातमी! संजय राठोडांना कोरोनाची लागण, घरातच औषधोपचार सुरू
या ठिकाणी पाहा सामना
या सामन्याचे थेट प्रक्षेपण डिझ्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. तसेच स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर देखील होणार आहे. हे सर्व सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.