मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता बिहारच्या राजकारणात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये देखील सत्तांतराची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपची साथ सोडणाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या सगळ्या प्रकरणावर लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिहारमधील संपूर्ण राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देत एलजेपीचे नेते चिराग पासवान म्हणाले, “ज्यांनी दुसऱ्यांचं घर फोडलं त्यांच्याच घरात आता फूट पडलीय”. चिराग पासवान राज्यातील राजकीय घडामोडींवर केलेले भाष्य सध्या खूप चर्चेचा विषय बनले आहे.
भाजपसोबत युतीत असणाऱ्या एलजेपीला डावललं गेल्याचा आरोप चिराग पासवान यांनी लावला. त्यांच्या या अश्या वागण्याला मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि जेडीयूचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीमध्ये आम्हाला कमी जागा मिळाल्या असं देखील ते म्हणाले होते. भाजपने मागच्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूसोबत सरकार स्थापन केलं आणि आता त्यांची ही यूती देखील तुटण्याच्या मार्गावर आहे.