Tomato Price Hike । गगनाला भिडले टॉमेटोचे दर! शेतकऱ्यांना खरच हा भाव मिळत आहे का? जाणून घ्या यामागची सत्यता

Tomato Price Hike

Tomato Price Hike । काही दिवसांपूर्वी टोमॅटो (Tomato) फेकून देण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली होती. कारण त्यातून लागवडीचा खर्चही मिळत नव्हता. राज्यात पावसाने हजेरी लावताच टोमॅटोने आता शेतकऱ्यांवर चांगले दिवस आणले आहेत. एकेकाळी कवडीमोल भावाने विकला जाणारा टोमॅटो आज 120 ते 150 रुपये भावाने (Tomato Price Hike) मिळत आहे. शेकातकऱ्यांना जरी याचा फायदा होत असला तरी सर्वसामान्यांना याचा चांगला फटका बसत आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । ठरलं तर मग! अजित पवार-भाजपचा आगामी निवडणुकीसाठी असा असणार जागा वाटपाचा फॉर्म्युला

परंतु बाजारात (Market) जरी टोमॅटोने शंभरी पार केली असली तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. मुसळधार पावसाने भाजीपाला महाग झाला असला तरी शेतकऱ्यांना अजूनही कमी दरात भाज्या कमी दरात विकाव्या लागत आहेत. याचा खूप मोठा फायदा व्यापाऱ्यांना होत असल्याचे MSP कमिटीचे सदस्य विनोद आनंद (Vinod Anand) यांनी सांगितले आहे.

Chandrayaan-3 । आनंदाची बातमी! भारताचं सर्वात मोठं मिशन चंद्रयान-3 ‘या’ दिवशी होणार लाँच

टोमॅटो हे असे एक पीक आहे, जे साठवण करून ठेवता येऊ शकत नाही. महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक, दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंड या भागात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धक्कदायक बाब अशी की, व्यापारी शेतकऱ्यांकडून 20 ते 30 रुपये किलोने टोमॅटो विकत घेत आहेत. परंतु टोमॅटोचा ट्रान्सपोर्ट आणि लेबर चार्ज जोडून 120 ते 160 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे. एकंदरीत टोमॅटोचे दर (Tomato Price) वाढले असले तरी याचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापारीवर्गाला होत आहे.

पुलाच्या कठड्याला धडकून बसचा भीषण अपघात; चालकासह १५ जण जखमी

Spread the love