Site icon e लोकहित | Marathi News

टोमॅटोचे भाव भिडले गगनाला, प्रति कॅरेट मिळाला ‘इतका’ रुपये दर

Tomato prices skyrocketed, per carat fetched Rs

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टी (Haivy rain), सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे(Farmers) खूप मोठं नुकसान होत आहे. इतकंच नाही तर आता दिवाळी 4 दिवसांवर येऊन ठेपली असताना यावेळी परतीच्या पावसाने तर सोयाबीनसह कापसाचे प्रचंड नुकसान (Huge loss) केलं आहे. तसेच जुन्या कांद्याला (onion) मिळणाऱ्या कमी दरामुळे कांदा उत्पादकांचा जीव कासावीस होत असून त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. असं असतानाच दुसरीकडे टोमॅटोची (Tomato) लाली कांद्यावर भारी पडली आहे.

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेच्या टार्गेटवर

कांदा टोमॅटो खरेदी विक्रीचे माहेरघर म्हणून पिंपळगाव बाजार समितीची ओळख सगळीकडे आहे. दरम्यान पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोला चालू हंगामातील सर्वाधिक दर म्हणजे प्रति कॅरेटला 881 रुपये दर मिळाल्याने टोमॅटो उत्पादकांत आनंदाचे वातावरणात आहे. तसेच व्यापाऱ्यांनी टोमॅटो आवक घटल्याने दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याच पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला अवघा 2200-2300 प्रति क्विटल भाव मिळला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांत संतापाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसाने टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणावर फुलगळ झाली होती. यामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेच्या टार्गेटवर

त्यामुळे टोमॅटोची आवक घटली आणि त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोला वाढीव दर मिळत आहे. दरम्यान मागच्या शुक्रवारी बाजार समितीत 2 लाख 33 हजार 720 टोमॅटो कॅरेटची आवक झाली होती. त्यावेळी टोमॅटोला 20 किलो प्रति कॅरेट्सला वर्षातील सर्वाधिक 881 भाव मिळाला. सरासरी 532 तर कमीत कमी 250 रुपये बाजारभाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादकांत समाधानाचे वातावरण आहे. टोमॅटोची आवकमध्ये घट झाल्याने त्याचे दर 900 रुपये प्रति कॅरेट्सपर्यंत येऊन ठेपले आहेत. दरम्यान व्यापाऱ्यांनी येत्या काही दिवसात जर पुन्हा पाऊस झाला तर टोमॅटोचे भाव हजारी पार करतील असा अंदाज वर्तविला आहे.

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस केला डबल

Spread the love
Exit mobile version