Tomato Price । टोमॅटोच्या किमती पुन्हा कोसळणार? येत्या काळात कसे असेल बाजाराचं चित्र, जाणून घ्या

Tomato prices will collapse again? Find out how the market will be in the future

Tomato Price । पुणे : एकेकाळी कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला (Tomato) आज अच्छे दिन आले आहेत असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कारण मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमतीत (Tomato Rate) विक्रमी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटोची (Tomato Price Hike) विक्री करून काही शेतकरी लखपती तर काही शेतकरी करोडपती झाले आहेत. अजूनही भाव कमी झाले नाहीत. (Latest Marathi News)

Weather forecast । नागरिकांनो.. काम असेल तरच बाहेर पडा, ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

टोमॅटोला समाधानकारक भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा परिणाम झाला आहे. किमती वाढल्याने त्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन टोमॅटो खरेदी करावा लागत आहे. अनेकजण तर टोमॅटो खरेदी करणे टाळतात. शेतकऱ्यांसाठी आता एक धक्का देणारी बातमी आहे.

Manipur Violence | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडका! हल्ल्यात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू

कारण आता या महिन्यामध्ये टोमॅटोचा भाव पुन्हा कोसळणार (Tomato Price Falls Down) असल्याचा अंदाज सरकारसह काही संस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. साहजिकच येणाऱ्या काळात आवक वाढू शकते. त्यामुळे किमतीत कपात होऊ शकते. जर असे झाले तर शेतकरीवर्गाला फटका बसू शकतो.

NCP Crisis । पुन्हा राजकीय भूकंप, राष्ट्रवादीचा आणखी एक गट फुटण्याच्या तयारीत; जयंत पाटलांच्या नावाची चर्चा

दरम्यान, सध्याचा घाऊक भाव ७० ते ९० रुपयांवरून निम्मा म्हणजेच घाऊक भाव ३५ ते ४५ रुपयांपर्यंत होईल असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. याचा परिणामही येत्या काळात दिसून येईल.

Cabinet Expansion । अखेर मुहूर्त मिळाला! पुढच्या आठवड्यात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार?

Spread the love