अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. डाळींच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटो ( Tomato) आणि बटाट्याच्याचे (Potato) दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी खिसा मोकळा करावा लागणार असल्याचे दिसत आहे.
परतीच्या पावसाचा तमाशा फडांना बसला जोरदार फटका; ‘या’ ठिकाणचे तमाशे तात्पुरते बंद
पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादनात 4 टक्के घट झाल्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केलाय. यामुळे यावर्षी टोमॅटोचे उत्पादन 23.33 दशलक्ष टन होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
उर्फी जावेदला मागे टाकत बहिण डॉली जावेदने परिधान केला ‘असा’ ड्रेस; हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ
आधीच टोमॅटोचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. यावर्षी दिवाळीच्या तीन ते चार दिवस आधी टोमॅटोचे भाव वाढू लागले. सध्या टोमॅटोचे भाव ८० रुपये किलोवर आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पुरवठ्यात घट होऊन टोमॅटोचे दर वाढले आहेत.
कापसाला किमान 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी