Tomato Rate : सध्या देशामध्ये टोमॅटोचे दर चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. गृहिणींना टोमॅटो खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. काही लोकांच्या भाजी मधून तर टोमॅटो गायब झाला आह. बाजारामध्ये 150 ते 200 रुपये प्रति किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे. त्यामुळे आता या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Tomato Rate Today)
Virat Kohli । इंस्टाग्राम कमाईवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी इतके पैसे…”
अर्थमंत्र्यांनी दिली माहिती (Finance Minister Nirmala Sitharaman)
टोमॅटोची वाढते दर पाहता केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी दिली आहे. काल नेपाळमधून भारतात टोमॅटोचा पहिला लॉट दाखल झाला आहे. नेपाळमधून भारतात टोमॅटो आयात करणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी लोकसभेमध्ये दिले आहे. टोमॅटो आयातीचा पहिला लॉट उत्तर भारतातील वाराणसी, लखनऊ आणि कानपूर शहरांमध्ये पोहोचण्याची शक्यता असल्याचे निर्मला सीताराम म्हणाल्या आहेत.
Sanjay Raut । नवाब मलिकांना जामीन कसा मिळाला? राऊत म्हणाले, नवीन इंजेक्शन घेतले …
टोमॅटोच्या उत्पन्नात घट
अवकाळी पाऊस जास्त, तापमान तसेच पिकांवर झालेल्या रोगामुळे टोमॅटोचे मोठे उत्पादन घटले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टोमॅटोचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे बाजारामध्ये टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे आणि मागणी वाढली असल्यामुळे टोमॅटोला चांगला तर मिळत असल्याचे बोलले जात आहे.
टोमॅटोसह डाळिंबाच्या किमती भिडल्या गगनाला
टोमॅटोच्या किमतीत चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता डाळिंबाच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांचे तर आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. पालेभाज्यांचे वाढते दर पाहता शहरी भागातील नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.