
सध्या टोमॅटोचे दर (Tomato Price) गगनाला भिडले आहे. प्रत्येक घरात देखील त्याचीच चर्चा सुरु आहे. एकेकाळी कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या टोमॅटोने आज शंभरी पार (Tomato Price Hike) केली असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जरी शेतकऱ्यांना अच्छे दिन आले असले तरी सर्वसामान्यांना त्याचा खूप मोठा फटका बसला आहे. पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन त्यांना टोमॅटो खरेदी करावा लागत आहे. (Latest Marathi News)
शेतकऱ्याचा नादच नाही! एकाच दिवसात टोमॅटो विक्रीतून कमावले तब्बल 38 लाख रुपये
जसे टोमॅटोचे (Tomato) दर वाढले तसे तुम्हाला त्याच्या अनेक चर्चा ऐकायला मिळाल्या असतील. तसेच टोमॅटोवरून मारामारी झाल्याचेही तुम्ही पाहिले असेलच. परंतु टोमॅटो एका शेतकऱ्याच्या चांगलाच जीवावर बेतला आहे. ही घटना आहे आंध्र प्रदेशमधील. येथे एका शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून ३० लाख रुपये कमावले. मात्र त्याचा याच कारणामुळे खून झाला आहे. या हत्येमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
आंध्र प्रदेश येथील अन्नामय्या जिल्ह्यात राहत असलेले नरेश राजशेखर रेड्डी (वय ६२) हे दूध विक्रीसाठी जात होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात अडवून त्यांचे हात-पाय बांधले आणि टॉवेलने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह बुधवारी मदनपल्लेतील बोडिमल्लादिने गावात सापडला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीस करत असून त्यांना 3-4 जणांनी मिळून हत्या केल्याचा संशय आहे.
दरम्यान, ही हत्या जरी पैसे लुटण्याच्या बहाण्याने झाली असली तर त्या शेतकऱ्याकडे खरच पैसे होते की नाही याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. दोन्ही मुली विवाहित असून त्या बंगलोर या ठिकाणी राहत आहेत.
नाशिक येथील ‘त्या’ अपघातावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…