Tomato Price Hike । नारायणगावचे टोमॅटो पुन्हा चर्चेत! किलोला मिळतोय ‘इतका’ भाव

Tomatoes of Narayangaon are in discussion again! A kilo is getting 'so much' price

Tomato Price Hike । पुणे : टोमॅटो (Tomato) आणि कांदा (Onion) हे असे पीक आहे, ज्याला दरवर्षी भाव असो वा नसो मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. अनेकदा शेतकऱ्यांना भाव नसल्याने ही पिके शेतात तशीच सोडून द्यावी लागतात. परंतु यावर्षी टोमॅटोमुळे (Tomato Price) शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. टोमॅटोला चांगले भाव (Tomato Rate) मिळाल्याने अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत टोमॅटोची चर्चा आहे. (Latest Marathi News)

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! कांद्याचे भाव क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी वाढले

नारायणगावला टोमॅटोचे हब (Tomato hubs) म्हणतात. परंतु याच नारायणगावात काहीशी वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. नारायणगाव (Narayangaon) बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे येथे टोमॅटोचे भाव कोसळले (Tomato prices fell) आहेत. मागील महिन्यात टोमॅटोच्या क्रेटला 3500 रुपये इतका बाजारभाव मिळाला होता. परंतु काल येथे नऊ हजार क्रेटची आवक वाढल्याने 20 किलोच्या क्रेटला अकराशे रुपये इतका भाव मिळाला आहे.

Bhimashankar Temple । भीमाशंकरला दर्शनाला जाताय? एकदा ही नियमावली पहाच

दरम्यान, यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली. उत्पादन कमी झाल्याने टोमॅटोच्या किमती वाढल्या. परंतु आता बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. आता एका क्रेटला 700 ते 1000 रुपये इतका भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Reserve Bank of India । मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने ‘या’ चार बँकांना ठोठावला दंड, केली मोठी कारवाई

भाव कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल. त्यांना आता पुन्हा एकदा कमी किमतीत टोमॅटो खरेदी करता येतील. परंतु टोमॅटोचे पुन्हा भाव कोसळले तर शेतकऱ्यांना याचा खूप मोठा बसू शकतो.

मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी सरकारमध्ये हालचाली सुरु, जाहीर केली नवीन यादी

Spread the love