Tourist Places । पर्यटकांनो.. फिरायला जात असाल तर थांबा, ‘या’ पर्यटनस्थळांवर आहे बंदी

Tourists.. If you are going for a walk, stop, there is a ban on 'these' tourist spots

Tourist Places । गगनबावडा : राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने (Rain in Maharashtra) धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटक (Tourists) आता धबधब्यांचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. प्रामुख्याने रविवार हा जवळपास सर्वांचा सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत या धबधब्यांवर येतात. पाण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. (Latest Marathi News)

Maharashtra Rain | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

परंतु अनेकांना हा आनंद नडतो. अशातच जर तुम्ही गगनबावडा (Gaganbawda) या ठिकाणी फिरायला (Tourism) जात असाल तर थांबा. कारण या तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे आजपासून तालुक्यातील सहा पर्यटनस्थळांवर पर्यटक आणि नागरिकांसाठी प्रवेश नसणार आहे. पावसाचा जोर कमी होईपर्यंत ही पर्यटनस्थळे बंद ठेवली जाणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी दिली आहे.

हत्या की आत्महत्या? घरात सापडले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह

सुरक्षिततेच्या कारणास्तव गगनगिरी गड, लखमापूर, पळसंबे रामलिंग लेणी, अणदूर, कोदे आणि वेसरफ या तलावांच्या सांडव्याचा परिसर तसेच इतर पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, यापूर्वी मुसळधार पावसामुळे अनर्थ घडले आहेत. त्यामुळे पुन्हा असा अनर्थ घडू नये यासाठी प्रशासनाकडून पाऊले उचलण्यात आली आहेत.

Rahul Gandhi । राहुल गांधींना मिळणार दिलासा? न्यायालयाने बजावली गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदींना नोटीस

Spread the love