Accident News । अमरावती : देशात दररोज अपघात (Accident In India) घडत असतात. या अपघातांमुळे अनेकांना कायमचे अपंगत्व येते तर काहींना आपला जीव जागीच गमवावा लागतो. अपघातांमुळे (Accident) त्या व्यक्तीचे कुटुंब उध्वस्त होते. कडक कायदे आणि रस्ते चांगले केले तरी अपघातांचे सत्र थांबले नाही. काही अपघात चालकांच्या चुकीमुळे होतात. यामुळे निष्पाप व्यक्तींचा जीव जातो. (Latest Marathi News)
अमरावती जिल्ह्यात ट्रॅक्टर पलटी होऊन एक भीषण अपघात (Accident in Amravati) झाला आहे. यात 35 मजूर होते, त्यापैकी नऊ मजूर गंभीर जखमी झाले आहे. दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिरोली फाट्याजळ हा अपघात (Tractor accident) झाला असून अपघाताची माहिती मिळताच तातडीने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिरोली फाटा परिसरात मजुरांना शेतातून परत नेत असताना हा भीषणअपघात झाला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आदिवासी मजुरांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे नेण्यात आले आहे.