Site icon e लोकहित | Marathi News

यंदाच्या वर्षी २५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरसाठी अनुदान; अर्जही झाले दाखल

पूर्वीच्या काळात शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडी वापरण्यात येत होती. मात्र आजकाल मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर (Tractor) वापरला जातो. ट्रॅक्टरमुळे वेळेची व श्रमाची बचत होते. मात्र मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना स्वतःचा ट्रॅक्टर घेणे शक्य नसते. यामुळे सरकारने पुढाकार घेत ट्रॅक्टरसाठी अनुदान (Subcidy) जाहीर केले होते. दरम्यान शेतकऱ्यांकडून या अनुदानातील ट्रॅक्टरसाठी मागणी वाढली आहे.

बापरे! भर रस्त्यामध्ये ‘या’ व्यक्तीने केला उर्फी जावेद हिला प्रपोज

राज्यातील १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानित ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत. मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने चालू आर्थिक वर्षात राज्यातील फक्त २५ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे. २०२२-२३ मध्ये सरकारने १५ हजार शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर दिले होते.

सहा मुलांच्या आईवर प्रेमाचे भूत! प्रेमसंबंधांमुळे केला पतीचा खून…

राज्य सरकारकडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखांचे तर मागासवर्गीय,दिव्यांग, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वा लाखांचे अनुदान ट्रॅक्टर साठी दिले जाते. त्यानंतर उर्वरित रक्कम शेतकरी हप्त्याने ट्रॅक्टरच्या कंपनीला देतात. सध्या ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

“भाजपच्या तमाशातला नाच्या”, नितेश राणे यांच्यावर ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने केली खरमरीत टीका

Spread the love
Exit mobile version