गेली अनेक दिवस मराठीत एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे रौंदळ'(Raundal). या सिनेमाच्या नावामुळे सिनेमाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांची उत्तर ३मार्चला प्रेक्षकांना मिळणार आहेत. मात्र त्या आधी सिनेमाची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर ३ मार्च २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होणार आहे.
“…त्यामुळे मला ट्रोल करणं थांबवा”; गौतमी पाटीलनं केलं भावनिक आवाहन
रौंदळचा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला सिनेमाच्या संपूर्म टीमने हजेरी लावली होती. मराठी सिनेसृष्टीमध्ये चर्चेत असलेल्या या रौंदळ सिनेमात भाऊसाहेब शिंदेची प्रमुख भूमिका आहे. ‘रौंदळ’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी सिनेमात दाखवण्यात येणार आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! सत्तासंघर्षाच्या सुनावणीत पहाटेच्या
या चित्रपटातील ‘मन बहरलं…’, ‘ढगानं आभाळ…’ आणि ‘भलरी…’ हि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. तसेच या चित्रपटत एक सर्वात महत्वाचा प्लस पॉइंट आहे तो म्हणजे ‘अहो, लय अहंकार नका करू. सोन्याची लंका होती रावणाची…’ हा डायलॉग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचवेळी नवोदित अभिनेत्री नेहा सोनावणेसोबतची भाऊसाहेबची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. तसेच भाऊसाहेब यांचा रांगडा लुक पहायला मिळणार आहे.
‘या’ देशात सर्वात जास्त प्रमाणात कंडोम वापरले जाते; भारतात सुद्धा