Train Accident । धक्कादायक! डब्यात चढताना महिला लेकरांसह रुळांवर पडली

Train Accident

Train Accident । रेल्वे स्थानकावर अनेक चित्र-विचित्र अपघात झाल्याचे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. सध्या देखील बिहारच्या दानापूर रेल्वे विभागातील बाढ स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक महिला तिच्या दोन मुलांसह रुळावर पडली यानंतर समोरून वेगाने ट्रेन आली आणि त्या महिलेच्या अंगावरून ट्रेन गेली. मात्र महिलेने लेकरांना उराशी कवटाळलं आणि तशीच रुळावर झोपून राहिली. अवघ्या ४ ते ५ इंचावरून रेल्वेचे डबे जात होते मात्र महिलेने प्रसंगावधान राखलं आणि अंगावरून ट्रेन जाईपर्यंत जराही हालचाल केली नाही.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली

महिला आणि तिची मुलं रुळावर पडल्याचे पाहून तेथील आसपासचे लोक घाबरले. मात्र या घटनेमध्ये सुदैवाने कोणालाही काही झालेलं नाही. संपूर्ण ट्रेन त्यांच्या अंगावरून गेली मात्र महिलेने लेकरांना उराशी घट्ट धरलं आणि तशीच झोपून राहिल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. (Train Accident)

Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली पुढची रणनीती

याबाबत अधिकची माहिती अशी की, ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रेल्वे स्थानकातील प्रवासी ट्रेनमध्ये चढू लागले ट्रेनमध्ये चढताना महिला तिच्या दोन मुलांसह खाली पडली आणि फलाट आणि रूळ यांच्यामध्ये अडकली यानंतर तिला लोक मदत करण्याआधीच ट्रेन सुरू झाली. ट्रेन सुरू होतात सर्वांनी श्वास रोखून धरला महिलेसह तिच्या दोन मुलांचा जीव देखील संकटात होता मात्र महिलेच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला आहे.

Sunil Kedar’s MLA canceled । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द

Spread the love