Trending news । गावात शिरला वाघ अन् सगळीकडे गोंधळच गोंधळ, घराच्या भिंतीवर झोपला; काही केल्या हालेना…पाहा थरकाप उडवणारा Video

Viral Video

Trending news । सध्या जंगलांचे प्रमाण हे कमी झाले आहे. त्यामुळे वन्य प्राणी आपल्याला गावात हिंडताना दिसतात. बऱ्याच वेळा प्राणी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धुडगूस घालतात. मानवाला अनेकदा इजा देखील पोहोचवतात. बऱ्याच वेळा गावात बिबट्या किंवा वाघ शिरल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. सध्या देखील सोशल मीडियावर वाघ गावात शिरल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Trending Video)

Viral News । ऐकावं ते नवलच! मटन नल्लीवरून वऱ्हाडीमध्ये जोरदार भांडण… लग्नही मोडलं; कारण एकूण पोलीसही चक्रावले

माहितीनुसार, उत्तर प्रदेशाच्या पिलीभित व्याघ्र प्रकल्पातून एक वाघ थेट शेजारच्या गावाकडे आला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा वाघ गाव गावात शिरला आणि भिंतीवर जाऊन बसला. त्यानंतर सकाळी गावकऱ्यांनी उठल्यानंतर हा प्रकार पाहिला यावेळी गावकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर या वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी देखील केली.

Abhishek Bachchan । “त्यावेळी अंगावर कपडेही..” अभिषेक बच्चन याने सांगितलं ‘तो’ अनुभव

वाघ गावात शिरल्याचे समजताच काही लोकांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघ काही गेला नाही. नाही सध्या वाघाच्या या थरारक भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Maratha Reservation । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंची सभा घेणाऱ्या ११ आयोजकांवर गुन्हा

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गावातल्या एका भिंतीवर वाघ आरामात बसला आहे. त्याचबरोबर त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची देखील मोठी गर्दी जमा झाली आहे. काही गावकरी त्याला पळून लावण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. मात्र वाघ बिनधास्त घराच्या भिंतीवर आराम करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Car Accident । क्षणात होत्याच नव्हतं झालं, चालत्या कारवर ट्रक उलटला; संपूर्ण कुटुंब उध्वस्त

Spread the love