पुण्यात आज कसबा व चिंचवड पोटनिवडणूकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. ( kasba Chinchwad Assembly Elections) दोन्ही ठिकाणी भाजप व महाविकास आघाडीमध्ये चांगलीच चढाओढ आहे. प्रचाराच्या काळात दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पुणेकरांनी खास शक्कल लढवली आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलीची कमाल! अभ्यास सांभाळत करते 20 एकर शेती; कमावते मोठे आर्थिक उत्पन्न
कसब्यात मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे यासाठी ‘मतदानाची शाई दाखवा आणि मोफत चहा मिळवा’ अशी हटके संकल्पना अंमलात आणली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम कोणत्या राजकीय पक्षाने केला नसून कसबा मतदारसंघातील काही नागरिकांनी मिळून केला आहे.
आदिल ड्रायव्हर असून तो झोपडपट्टीत राहतो, राखी सावंतने केला मोठा खुलासा
एवढंच नाही तर मतदान करा आणि मोफत पुस्तक मिळवा हा उपक्रम देखील आज कसबा मतदारसंघात सुरू आहे. याशिवाय मतदानात महिलांची संख्या जास्त दिसावी यासाठी एका फोरमने मतदान करा आणि फ्रीमध्ये हातावर मेहेंदी काढून घ्या. अशी संकल्पना राबविली आहे. या स्तुत्य उपक्रमांमुळे कसब्यात किती टक्के मतदान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शेताच्या बांधावर जाऊन रोहित पवारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या!