Accident News । रस्ते कितीही चांगले केले तरी अपघातांचे (Accident) सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याचे समोर येत आहे. अपघातात अनेकांचे जीव जातात. यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त होते. सध्या असाच एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest marathi news)
बीड जिल्ह्यात हा अपघात (Beed Accident) झाला आहे. कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील माऊली फाट्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक (Truck-Bike Accident) झाली आहे. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये दुचाकीवर असणाऱ्या मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भागवत उर्फ पप्पू सुभाष इंगळे (वय 22, रा.राजेगाव) आणि मालन सुभाष इंगळे (वय 47, रा.राजेगाव) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वाहनांच्या वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याने आणखी एका अपघातात भर पडली आहे.