
Nana Patole । काल भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून माघारी येत असताना ट्रकने मागून जोरात धडक दिली. या अपघातात नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात नसून घातपात आहे, असा संशय काँग्रेसकडून (Congress) करण्यात येत आहे. अशातच आता कार अपघातप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. (Nana Patole Car Accident)
नाना पटोलेंच्या कारला धडक देणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलिसांनी ट्रक चालकाला देखील अटक केली आहे. हा अपघात होता की घातपात याची कसून चौकशी आता पोलीस ट्रक चालकाकडून करत आहेत. दरम्यान, हा अपघात होता की घातपात? पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल,अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे.
दरम्यान, नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांचा प्रचार दौरा करून परतत होते. त्यावेळी ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने मागून जोरात धडक दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाना पटोले हे ज्या कारमध्ये बसले होते, त्यांच्या कारच्या मागच्या भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवाने नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणाला दुखापत झाली नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Pune Crime । पुण्यात नेमकं चाललंय काय? आधी समोस्यात कंडोम, आता बर्फाच्या लादीत….