मुंबई | सध्या उरुस यात्रा सुरु आहेत. तसेच ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कुठे किर्तन तर कुठे लावणीचा कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अशातच सध्या गौतमी पाटील तिच्या लावणीमुळे प्रचंड चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असते.
यावरुनच इदुंरकर महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख आणि आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं विधान इंदुरीकरांनी केलं होत. आम्ही किर्तनाला पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो.
असं वक्तव्य करत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी भाष्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्याच्या या वक्तव्याबद्दल महाराजानां सुनावल आहे. तसेच तिला इतक मानधन मिळत आहे तर तुमच्या पोटात का दुखत आहे? असा सवाल केला आहे.
मोठी बातमी ! शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत नवी अपडेट
महिला पुढं गेलेलं पहावत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या. तुमचा ब्लॅकचा पैसा कोठे जातो? असा सवाल देखील देसाईंनी केला. गौतमी पाटीलच्या या वादात आता इंदुरकर महाराज आणि तृप्ती देसाई याच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…