Stuffed Idli Recipe। सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरून ट्राय करा मऊ आणि लुसलुशीत स्टफ्ड इडली; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

Stuffed Idli Recipe। सुट्टीचा दिवस (Holiday) असला की अनेकांना वेगवेगळे पदार्थ (Foods) चाखण्याची इच्छा होते. परंतु या सगळ्यात गोंधळ उडतो तो गृहिणींचा. अनेकांच्या घरी गरमागरम कांदा भजी, मिसळपाव, बटाटे वडे, इडली, डोसा, पावभाजी यांसारखे पदार्थ बनवले जातात. तरीही अनेकांना हे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्ही आता स्टफ्ड इडली (Stuffed Idli) ट्राय करू शकता. (Latest Marathi News)

Congress | “शिवसेना-राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार”; मुख्यमंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ

अनेक स्वयंपाक घरात स्टफ्ड इडली (Stuffed Idli Making Recipe) बनवली जाते. कमीत कमी वेळेत मऊ आणि लुसलुशीत स्टफ्ड इडली बनवता येते. यासाठी तुम्हाला 500 ग्रॅम रवा, 2 टेस्पून तेल, 10-12 कढीपत्ता, २ टीस्पून उडीद डाळ, बारीक चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या, 3/4 टीस्पून इनो, 300 ग्रॅम दही आणि चवीनुसार मीठ लागेल.

Pune Metro | नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यामध्ये मेट्रो झाली सुरू; काय आहे तिकीट दर? जाणून घ्या एका क्लिकवर

स्टफिंग बनवण्यासाठी तुम्हाला २ उकडलेली बटाटे, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून आल्याची पेस्ट, अर्धा टीस्पून मीठ, १ कप बारीक चिरलेला पालक आणि 2 टीस्पून तेल गरजेचे आहे.

Milk Rate । म्हशीच्या दुधाला मिळाला चक्क 98 रुपये दर; कुठे मिळाला हा दर? जाणून घ्या

आता स्टफ्ड इडली (Idli) बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका खोलगट भांड्यात चमच्याच्या मदतीने रवा आणि दही मिक्स करून थोडे थोडे पाणी घाला. त्यात थोडे मीठ घाला. परंतु हे लक्षात ठेवा की इडलीचे पीठ हे जाड राहावे. हे पीठ एकूण २० मिनिटे झाकून ठेवावे. असे केल्याने रवा फुलतो. २० मिनिटानंतर एका कढईत तेल ओतून गॅसवर ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून ते थंड होऊ द्या. त्यानंतर कढीपत्ता, उडीद डाळ टाकून ते ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. आता त्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सर्व मसाले टाकून व्यवस्थित तळून घ्या.

Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा! समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

उकडलेले बटाटे मॅश करा. कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी तळा. आता त्यात चिरलेले आले आणि हिरवी मिरची टाकून त्यानंतर त्यात पालक घालावा ते मऊ होईपर्यंत शिजवून थोडेसे मीठ घाला आणि मिक्स करावे. त्यानंतर आता एका कुकरमध्ये ३ कप पाणी गरम करा. इडलीसाठी बनवण्यात आलेल्या मिश्रणात इनो टाकून ते थोडे ढवळून ५ मिनिटे तसेच ठेवा. असेल केल्याने इडली फुगते आणि स्पंजी होते.

Samruddhi Mahamarg Thane । समृद्धी महामार्गाचे काम चालू असतानाच घडली मोठी दुर्घटना! 17 जण जागीच ठार

इडली बनवण्यासाठी साच्याला तेल लावून त्यामध्ये निम्मे इडलीचे मिश्रण चमच्याने टाका. आता सारण घालून त्यावर थोडे इडली पिठा टाकावे. यानंतर इडलीचा साचा कुकरची शिटी काढून ठेवा. हे लक्षात ठेवा की अवघे 10 ते 15 मिनिटे पूर्ण आचेवर इडली शिजवावी. जर तुम्ही जास्त वेळ इडली ठेवली तर इडली कडक होते. 10 ते 15 मिनिटानंतर झाकण काढून इडली शिजली आहे की नाही ते पहा. त्यानंतर ती इडली इतरांना खायला द्या.

जबरदस्त फीचरसह स्मार्टफोनपेक्षाही स्वस्तात खरेदी करता येईल जिओचा नवीन लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Spread the love