पुन्हा एकदा राज्य सरकारने प्रशासकीय सेवेतील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या २० सनदी अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांचा समावेश आहे. त्यांच्या कामाच्या शैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. अवघ्या महिनाभरातच त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
सर्वात मोठा रेल्वेचा भीषण अपघात, 233 लोक जागीच ठार तर 900 जण गंभीर जखमी; बचावकार्य अजूनही सुरूच
तुकाराम मुंढे हे चोख आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. आपल्या कामकाजाच्या शैलीमुळे ते कायम चर्चेत असतात. त्यांच्या प्रशासकीय सेवेतील १८ वर्षाच्या कार्यकाळामध्ये २१ वेळा बदल्या झाल्या आहेत. गेल्या महिन्यातच त्यांची बदली झाली होती. त्यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
नामांतराच्या घोषणेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, “नामांतराचे श्रेय…”
गेल्या महिन्यात कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुन्हा महिनाभरातच राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. त्यांच्यावर मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रोहित पवार यांनी पंकजा मुंडेंना दिला मोठा सल्ला; म्हणाले, “जनतेसमोर या आणि…”