Site icon e लोकहित | Marathi News

तुनिषाच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट समोर; गरोदर असण्याबाबत मोठा खुलासा

Tunisha's postmortem report in front; Big reveal about being pregnant

आत्महत्या ही फक्त सामान्य लोकांची होते. हा समज आजकाल गळून पडत आहे. परंतु, दिवसेंदिवस मोठे सेलेब्रिटी लोक सुद्धा आत्महत्या करताना पहायला मिळत आहेत. दरम्यान हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी शीझान खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

मुंबईमधील वसई ( Vasai) जवळच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग चालू असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. तुनिषाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. यामध्ये गळफासामुळे तुनिषाचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. 27 डिसेंबर रोजी तुनिषाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मुलांना चॉकलेट वाटणाऱ्या सांताक्लॉजला लोकांनी केली बेदम मारहाण

तुनिषाच्या आईच्या सांगण्यानुसार, शीझान खान आणि तुनिषाचा यांचे नुकतेच ब्रेक अप झाले होतं. यामुळे ती नैराश्यात होती. ती गरोदर असण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली होती. परंतु,शवविच्छेदन अहवालात गरोदर असल्याबाबत माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणी तुनिषाच्या आईने शीझान खान विरोधात तक्रार दिली होती. यामुळे वसई पोलिसांनी शीझानला अटक करून त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गौतमी पाटीलचे लोकांना भावनिक आवाहन; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”

Spread the love
Exit mobile version