Tunnel Accident । उत्तरकाशीमधील स्थिती अजूनही भयानक, बचाव पथके बोगद्याची भिंत हातोड्याने तोडणार, बचाव कार्यात वारंवार अडथळे आल्यानंतर मोठा निर्णय

Tunnel Accident

Tunnel Accident । उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यात 14 दिवसांपासून निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र, एकाही मजुराला बाहेर काढण्याचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. ड्रिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या यूएस निर्मित ऑगर मशीनच्या मार्गात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे, ऑपरेशनमध्ये गुंतलेले एनडीआरएफचे जवान आता पारंपारिक पद्धतीने हाताने ड्रिलिंग करण्याच्या पर्यायावर विचार करत आहेत. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी शनिवारी (२५ नोव्हेंबर) ही माहिती दिली. (Tunnel Accident Rescue 14th Day)

Ahmednagar Crime News । पारनेरमध्ये जागेच्या वादामधून अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह आईची हत्या

ड्रिलिंगच्या मार्गात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे आता एनडीआरएफचे जवान स्वतःहून कामगारांच्या जवळ आणलेल्या पाइपलाइनमध्ये उतरतील, असे सूत्रांनी सांगितले. 47 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. आणखी 10 मीटर ड्रिलिंग करावे लागेल. यासाठी, बचाव कार्यात गुंतलेल्या एजन्सीचे कर्मचारी ड्रिलिंगसाठी वापरल्या जाणार्‍या हातोडा, सेबल, गॅस कटर मशीन आणि सामान्य साधने यांसारख्या पारंपरिक साधनांसह उतरतील. पाईपच्या मार्गात येणारा अडथळा ते हाताने दूर करतील. हे खूप कठीण काम असेल आणि खूप वेळ लागेल. मात्र, यात यशाची आशा आहे.

Politics News । 31 डिसेंबरपर्यंत शिंदे सरकार पडणार, बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

कामगारांना वाचवण्यासाठी शुक्रवारी रात्री बोगद्याच्या कोसळलेल्या भागात खोदकाम पुन्हा थांबवावे लागले आणि बचाव प्रयत्नांना आणखी एक धक्का बसला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी ड्रिलिंग पुन्हा सुरू झाल्यानंतर काही वेळाने ऑगर मशीनला काही धातूच्या वस्तूमुळे ड्रिल करता आले नाही, त्यामुळे काम थांबवावे लागले. याच्या एक दिवस आधी ऑजर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अधिकाऱ्यांना बचावकार्य थांबवावे लागले होते.

Viral News । 33 वर्षीय बॉडीबिल्डर डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, जगाला फिटनेसच्या टिप्स द्यायचा

सततच्या अडथळ्यांमुळे औगर मशिनने ड्रिलिंग आणि ढिगाऱ्यांमध्ये स्टील पाईप टाकण्याचे काम सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत मॅन्युअल ड्रिलिंगचा विचार केला जात असला तरी त्यासाठी जास्त वेळ लागतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Ajit Pawar | अजित पवारांचा मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध? बड्या नेत्याने दिली कबुली

Spread the love