नाशिक पदवीधर निवडणूकीनंतर काँग्रेसचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे विजयी झाले. दरम्यान काँग्रेसकडून सत्यजीत तांबेना निलंबित करण्यात आले. यानंतर तांबे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय पक्षात सुरू होती. मात्र ‘मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे अपक्षच राहणार.’ अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी मांडली होती. यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
बीबीसीवर आयकर विभागाची धाड! काँग्रेसने केली केंद्र सरकारवर टीका
परंतु सत्यजीत तांबे भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. सत्यजीत तांबेनी ( Satyajeet Tambe) सोशल मीडियावर नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे ( Tweet) या चर्चा रंगल्या आहेत.
“…तर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकत”, वाचा नेमकं काय म्हणतात घटनातज्ञ
‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी’
असे ट्विट सत्यजीत तांबे यांनी केले आहे. या ट्विट मुळे राजकारणात ट्विस्ट आला असून सत्यजीत तांबे लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 14, 2023
नजरेत सदा नवी दिशा असावी ।
घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।