बॉलिवूडचे ‘करण अर्जुन’ म्हणून सलमान खान ( Salman khan) आणि शाहरुख खानला ओळखले जाते. बॉलिवूडची ही प्रसिद्ध जोडी नुकतीच ‘पठाण’ या चित्रपटात दिसली. चाहत्यांना देखील हा चित्रपट प्रचंड आवडला असून बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. दरम्यान ही जोडी पुन्हा एकदा एका चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहे.
मोठी बातमी! तब्बल ५ तासांनंतर रविंद्र धंगेकर यांच उपोषण मागे
हा चित्रपट दुसरा तिसरा कुठला चित्रपट नसून सलमान खानचा ‘एक था टायगर’ ( Ek Tha Tiger) हा चित्रपट असणार आहे. सलमान खानचा ‘एक था टायगर’ २०१३ साली प्रदर्शित झाला होता. दरम्यान याच चित्रपटाचा दुसरा भाग २०१७ साली प्रदर्शित झाला होता आणि आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुख खान ( Shahrukh Khan) आता एप्रिलच्या शेवटी या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सहभागी होणार आहे.
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाला आवडतो ‘हा’ बॉलिवूड अभिनेता; स्वतःच केला याबाबत खुलासा
एक था टायगरच्या तिसऱ्या भागाचे चित्रीकरण मुंबईमध्ये होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीषा शर्मा करणार असून इम्रान हाश्मी, कतरीना कैफ यांच्यादेखील प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड मधील दोन मोठे अभिनेते एका चित्रपटात दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य