दोन दिवसानंतर मुलाचं लग्न, नाचताना गाठले मृत्यूने; क्षणात झाल होत्याचं नव्हतं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Two days later the son's marriage, met with death while dancing; It did not happen in a moment, see the viral video

सध्या सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात. यातील काही व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही तर काही व्हिडिओ (Social media viral video) पाहून अश्रू थांबवता येत नाही. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक म्हत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे अनेकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु एका लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. (Latest Marathi News)

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! 16 आमदारांच्या निलंबनाबाबत राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिली ‘इतक्या’ दिवसांची मुदत

मिळालेल्या माहितीनुसार, अयोद्धा (Ayoddha) येथील पटरंग भागातील बैगंबर नगर गावातील ही घटना आहे. दिलशाद हे त्यांच्या घराशेजारील लग्नाच्या वरातीत सहभागी झाले होते. वरातीत ‘खाइ के पान बनारस वाला’ हे गाणे सुरु झाले आणि त्यांनी या गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. ते बेभान होऊन नाचत असताना काहीच वेळात होत्याच नव्हतं झाल. कारण नाचताना ते अचानक जमिनीवर कोसळले आणि पुन्हा उठलेच नाही. (Viral video)

हिरडगाव फाट्यावर अज्ञाताने धडकावले हरीण, तरुणांनी केली मदत; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल

त्यांना तातडीने शेजारच्या दवाखान्यात नेले परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मुलाचं दोन दिवसांनंतर लग्न होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांना एकच धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी ती काळरात्र ठरली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Ajit Pawar | अखेर ठरलं! अजित पवारांना मिळणार मंत्रालयात दालन, सांभाळणार ‘या’ खात्याची जबाबदारी

दरम्यान, दिलशाद यांना आताच नाही तर यापूर्वीही एकदा हार्ट ॲटॅक आला होता. त्यावेळी त्यांच्यावर लगेच उपचार केले होते. परंतु आता त्यांना जोराचा हार्ट ॲटॅक आल्याने त्यांना वाचवता आले नाही. या घटनेचं व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

धक्कादायक! दिल्ली बुडाली, सुप्रीम कोर्टाच्या दारात साचले पाणी

Spread the love