आपण नेहमी पाहतो किंवा अनुभवलय सुद्धा की लग्नकार्य (wedding ceremony) म्हणल की मानपान आला, रुसवा- फुगवा आलाच. या काही छोट्या-छोट्या वादांनवरून तर कधीकधी लग्नसुद्धा मोडत. दरम्यान अशातच आग्रा (Agra) शहरात एका लग्नात शुल्लक कारणाचे मोठ्या वादात रुपांतर झाले. फक्त वादच नाही तर यात एकाची हत्या (Murder) झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं वादाच कारण काय असेल. या वादाचे कारण होते ते रसगुल्ले. लग्नात रसगुल्ल्यावरुन (Rasgulla) दोन गटात तुंबळ हाणामारी (a fight) झाली.
विद्यार्थिनीचा संघर्ष! फुटपाथवर दिव्याच्या प्रकाशात अभ्यास; पाहा व्हायरल VIDEO
दरम्यान या हाणामारीत काही लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या, तर काहींनी चाकू आणि चमच्याने एकमेकांवर हल्ला केला. दरम्यान या हाणामारीत 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु या मारहाणीनंतर मुलाच्या घरच्यांनी हे लग्न मोडले आहे. दरम्यान या घटनेनंतर लग्नस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Urfi Javed: उर्फी जावेदला पोलिसांचा दणका! पहा नेमकं काय आहे प्रकरण?
नेमक प्रकरण काय आहे?
आग्रा येथील खंडौलीतील व्यापारी वकार यांची जावेद आणि रशीद अशी दोन मुले आहेत. दरम्यान या दोन्ही मुलांचे
लग्न एतमादपूरमध्ये ठरले होते. या दोन्ही मुलांचे उस्मानच्या मुली झैनाब आणि साजियासोबत ठरले होते. दरम्यान लग्नदिवशी या मुलांची वरात आली. तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. इतकंच नाही तर लग्नात खान्यापिण्याचे अनेक स्टॉलही लावण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ई-पीक पाहणीची अट झाली रद्द, आता थेट मिळणार शेतकऱ्यांना मदत
दरम्यान याचवेळी एका व्यक्तीला जास्त रसगुल्ला न दिल्यामुळे वाद पेटला. मग काय दोन्ही बाजूच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. यावेळी महिला व ज्येष्ठांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकायला तयार नव्हते. या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच, यात अनेक लोकही जखमी झाले. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.