
शाळेत विद्यार्थ्यांची भांडणे लागली तर शिक्षक (Teacher) मध्यस्थी करून वाद सोडवतात. बऱ्याचदा यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना (student) शिक्षा देखील केली जाते. मात्र शिक्षकांमध्येच वाद झाले तर? होय! पटना मध्ये अशी घटना घडली आहे. याठिकाणी बिहटा ब्लॉकच्या कौरिया पंचायतीच्या माध्यमिक शाळेच्या आवारात चक्क शाळेतील महिला मुख्याध्यापक (Head Master) आणि शिक्षिका यांच्यात भांडण लागले.
हे भांडण एवढे वाढले की, दोघीही जमिनीवर पडून एकमेकींना जोरदार लाथा आणि ठोसे मारू लागल्या. एवढेच नाही तर त्यांनी एकमेकांचे केस देखील ओढले. यावेळी बघ्यांची भरपूर गर्दी जमली होतील. यातील काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. (Viral Video)
येथील पंचायत प्रमुख राकेश कुमार यांच्या सांगण्यानुसार, बिहटा ब्लॉकच्या कौरिया पंचायत स्टेटस मिडल स्कूलच्या मुख्याध्यापिका कांती कुमारी आणि शिक्षिका अनिता कुमारी या दोघींमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होता. पाच महिन्यांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. यावरूनच गुरुवारी दोघींच्यात वाद झाला.
‘स्वतःच्या सोयीनुसार वापरलं…’; अखेर घटस्फोटवर मानसी नाईकने व्यक्त केली मनातली सल
हे प्रकरण थोड्याच वेळात इतके तापले की काही वेळातच दोन्ही शिक्षक एकमेकांशी भांडू लागले आणि शाळेचा परिसरच कुस्तीचा आखाड्यात बदलला. या दोघींमध्ये आधी असणारे वाद गटशिक्षणाधिकारी आणि पंचायतीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होऊन प्रकरण मिटले होते. आता मात्र पुन्हा एकदा दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे दोन्ही शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात येत आहे.
Koyta Gang | पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा धुमाकूळ, असच चालू राहिले तर पुण्याचाही बिहार होणार का?