Fire news : राज्यात सध्या उसाची तोडणी (Cutting sugarcane) सुरु आहे. ऊसतोड कामगार भल्या पहाटेच आपल्या मुलाबाळांसह ऊसतोडणीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता हे कामगार काबाडकष्ट करत असतात. अशातच आता आता एक धक्कादायक बाब घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest marathi news)
Sharad Pawar । शरद पवारांना राष्ट्रवादी नाव अन् पक्षचिन्ह परत मिळणार? महत्वाची माहिती समोर
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना धुळ्याच्या (Dhule) लोणखेडी गावात घडली आहे. आई-वडील ऊस तोडणीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यात गेले असताना धुळ्यात त्यांच्या दोन चिमुरड्यांचा जागीच होरपळून मृत्यू झालाय. मन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर आई-वडिलांचा आक्रोश अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारा होता. या प्रकरणाची धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
या दोन चिमुरड्यांचे मूळ गाव सटाणा तालुक्यातील असून ते लोणखेडी गावात आपल्या आजोळी आले होते. या मुलांची आजी गुरांना पाणी देण्यासाठी बाजुला गेल्या होत्या. त्याचवेळी अचानक झोपडीला आग लागली. पाहता पाहता वाऱ्यामुळे आगीने जोर धरत झोपडीतील साहित्य आणि पालापाचोळ्याचे छताने पेट घेतला आणि दोन्ही मुले झोपडीत अडकले. त्यांना बचावासाठी उशिराने प्रयत्न झाल्याने दुदैवाने या घटनेत दोघा मुलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
Ritesh Deshmukh । … अन् रितेश देशमुखला मंचावर अश्रू अनावर, नेमकं कारण काय?