श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथमधून काल एक धक्कदायक घटना समोर आली आहे. घरासमोरील शेततळ्यात बुडून दोन लहान भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. काल रविवार सुट्टीचा दिवस होता हे चिमुकले काल घरीच होते मात्र त्यांचे आई-वडील घरी नसताना रविवारी दुपारी हे दोघे शेततळ्याजवळ खेळत असताना पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.
नाटू नाटू गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळताच अमोल कोल्हेंचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
माहितीनुसार, आर्यन बंडोपंत साळुंखे (वय ९) व अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय ८) अशी अशी त्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. आई वडील दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते त्यावेळी हे दोघ भावंड घरी असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नवऱ्याला सुट्टी मिळत नाही म्हणून बायकोने केलं थेट झोपून ठिय्या आंदोलन!
पाण्याची सोय व्हावी म्हणून मागच्या आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या घरासमोर शेततळे करण्यात आले आहे. यावेळी काल सुट्टीच्या दिवशी दोघ भावंड या ठिकाणी खेळ असताना शेततळ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे.