सध्या एक आगळीवेगळीच घटना समोर येत आहे. मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवामध्ये एका तरुणासोबत अनोखा विवाह केल्याची घटना माळशिरस (Malshiras) तालुक्यातील अकलूज या ठिकाणी घडली आहे.
“संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळ केलं…”, शिंदे गटाचा हल्लाबोल
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली इथं आय टी इंजिनियरिंग (IT Engineering) करून चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलासोबत लग्नगाठ बांधली आहे . यामध्ये नवरदेवाचे नाव अतुल अवताडे असे आहे. हा तरुण माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील असून त्याचा मुंबई (Mumbai) या ठिकाणी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.
मोफत रेशनबाबतचा नवीन नियम देशभर लागू! सरकारने सुरू केली ‘ही’ सुविधा
पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी लहानपणापासून दिसायला एकसारख्या आहेत. त्या जेवण देखील एकाच ताटात करतात. त्यांना कायम एकत्र राहायचे होते त्यामुळे त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पिंकी आणि रिंकी यांना एकत्र राहण्यासाठी एकच नवरा हवा होता. अखेर कुटुंबीयांनी त्यांच्या या विवाहसोहळ्याला मान्यता दिली आणि २ डिसेंबरला हा विवाहसोहळा पार पडला.
जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा
(प्रतिनिधी सौरभ कर्चे)