
Bus Accident । रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे आज रत्नागिरीहून महाड दौऱ्यावर चालले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या कारच्या समोरच रत्नागिरी-वसई एसटी बसचा हातखांबा येथे अपघात (Accident) झाला. त्यावेळी उदय सामंत यांनी कोणताही विचार न करता ताफा थांबवला आणि जखमी प्रवाशांची मदत केली. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. (Latest Marathi News)
Mohan Bhagwat । मोहन भागवतांची डाव्यांवर सडकून टीका, म्हणाले; “मुलांच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबत..”
याबाबत अधिक माहिती अशी की उदय सामंत महाड दौऱ्यावर जात असताना त्यांच्यासमोर बसचा अपघात (Accident News) झाला. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे बस चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. बसची पुढची दोन चाके रस्त्यावरून खाली उतरली आणि बस एका बाजूला झुकली. या रत्नागिरी-वसई एसटी बसमध्ये एकूण २१ प्रवासी सापडले होते.
Credit Card । क्रेडिट कार्डचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? कमवता येणार अतिरिक्त पैसे
तातडीने उदय सामंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रवाशांना बाहेर काढले. तसेच त्यांनी जखमी प्रवाशांना आपल्या एस्कॅार्ट करणाऱ्या कारमधून दवाखान्यात उपचारासाठी पाठवले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी केलेल्या मदतीबद्दल जखमी प्रवाशांकडून त्यांचे आभार मानण्यात आले.