पुणे : माजी मंत्री तथा शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर अज्ञातांनी पुण्यात हल्ला केला. या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. या घटनेनंतर शिंदे गटातील प्रमुख दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि आमदार शंभूराजे देसाई (ShambhuRaje Desai) यांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. उदय सामंत यांच्या बरोबर नेमकं काय घडलं? याबाबत माध्यमांना त्यांनी माहिती दिली. “परमेश्वराच्या, जनतेच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी वाचलो. हा प्रकार फार विचित्र होता”, असे उदय सामंत म्हणाले.
याबाबतचा व्हिडिओ पोलिसांकडे आहे जे सांगायचे ते मी पोलिसांना सांगेल माझ्यापुढे आदित्य ठाकरे यांचा ताफा नव्हता मी खोटं बोलणार नाही. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जाताना माझ्यापुढे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा ताफा पुढे गेला होता. मी कुणालाही फॉलो केलं नाही सिग्नल लागल्यामुळे नियमांचे पालन करून थांबलो. त्यावेळी तिथे अचानक दोन गाड्या आल्या तिथे 50 ते 60 शिवसैनिक देखील होते पण त्यांनी काहीच केले नाही. दहा ते बारा लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या गाड्यांचे फोटो देखील माझ्याकडे आहे असं उदय सामंत त्यांनी माध्यमांना सांगितले.
माझ्याबरोबर हा प्रकार घडला त्याची थेट तळाशी जाऊन चौकशी केली पाहिजे. त्यांच्याकडे हत्यारे दगडे कशी आली? त्यांना माझ्या गाडीचा नंबर कसा समजला? याचा शोध लागला पाहिजे. त्यांनी मला शिवीगाळ देखील केली पण परमेश्वराच्या, मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद आणि प्रेमामुळे मी या घटनेतून वाचलो. अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.