मुंबई : नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या बैठकीमध्ये हजार असलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शेवटी उभा आहेत. याच मुद्द्यावरुन रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी हा फोटो आणि त्यासंदर्भात सुरु असणाऱ्या चर्चांवर मत व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
काय म्हणाले उदय सामंत?
रोहित पवार यांनी केलेल्या या ट्विटवरुन उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. एकनाथ शिंदेंना शेवटच्या रांगेत उभं केलं आहे असे रोहित पवार म्हणतात यावर तुमचं मत काय? यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, “फोटो बघितल्यावर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे केवळ फोटोसाठी तिथे उभे होते,”