यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला. काल मुंबईमधील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah) उपस्थित होते. मात्र एका घटनेने या कार्यक्रमास गालबोट लागले आहे. कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांपैकी १३ लोकांचा उष्माघाताने मृत्यु झाला आहे.
अजित पवार पुण्यातील दौरा रद्द करून गायब! राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता; चर्चांना उधाण
या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा भर उन्हात घेण्यापेक्षा संध्याकाळी घ्यायला हवा होता. अशी टीका विरोधी पक्षनेत्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर खारघरचे पालकमंत्री उदय सामंत ( Uday Samant) यांनी आपले वक्तव्य केले आहे. यामध्ये त्यांनी कार्यक्रम संध्याकाळी घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
१२ वर्षांच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा Video
” मुख्यमंत्र्यांना संध्याकाळीच कार्यक्रम घ्यायचा होता. परंतु, आम्हाला घरी जायला उशीर होईल अशी मागणी श्री सदस्यांनी केली. यामुळे कार्यक्रम सकाळी घेण्यात आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेली घटना दुर्दैवीच आहे. मात्र विरोधकांनी याचे राजकारण करू नये. अशा वेळी विरोधकांनी एकत्र यायला हवे. कार्यक्रमात श्री सदस्यांच्या सेवेत कोणतीही कमी ठेवण्यात आली न्हवती. त्यांच्यासाठी योग्य त्या आरोग्य सेवांचे आयोजन केले होते. ” असे उदय सामंत म्हणाले आहेत.