Udayanraje Bhosale । साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत मोठे संकेत दिले आहेत. उदयनराजे भोसले यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले की, निवडणूक लढायची खाज भागली आहे. त्यामुळे बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली हे देखील मला समजलं नाही. असं त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर शासनामध्ये जसं निवृत्तीचे वय असतं त्याचप्रमाणे राजकारणात देखील निवृत्तीचे वय असावं राजकारण्यांनी हे लागू केले पाहिजे. असे देखील उदयनराजे यांनी म्हटले आहे. आपल्याकडे प्रत्येक जण म्हणतो की, लोकांचा आग्रह होता म्हणून मी निवडणूक लढलो मात्र हे कुठेतरी थांबायला हवं. शरद पवार यांनी आता मार्गदर्शक म्हणून असावे असे मला वाटते असे देखील उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
Gopichand Padalkar । सर्वात मोठी बातमी! गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका; स्वतःच दिली माहिती
मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले उदयनराजे?
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केल आहे, यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, कायदा प्रमाणे लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्या असे म्हटले आहे. बाकीच्या समाजाला तुम्ही आरक्षण देता सर्वांना समान बुद्धी दिलेली नाही मात्र खरी चूक ही त्यावेळच्या राज्यकर्त्यांची आहे. त्यावेळी मंडळ आयोग होतं, त्यांनी मागासवर्गीयांचं चुकीचं विश्लेषन केलं. व्यक्ती कोणत्याही जातीची असु द्या आर्थिकदृष्ट्या दुर्लभांना सहकार्य करा असं मतही उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे.
NCP Crisis । शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का? सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या याचिका