उदयनराजे भोसले नाराज?, प्रतापगडावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत

Udayanraje Bhosle angry?, will not attend the program at Pratapgad

साताऱ्यातील प्रतापगड (Pratapgad) किल्ल्यावर शिवप्रताप दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. पण या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

एखाद्या महिलेकडे टक लावून पाहताय तर सावधान; 14 सेकंदापेक्षा जास्त वेळ झाल्यास होऊ शकते शिक्षा

राज्यपाल भगत सिंगकोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज एक वादग्रस्त विधान केले होते त्यामुळे उदयनराजे नाराज आहेत. आणि यामुळे ते प्रतापगडावर देखील कार्यक्रमाला जाणार नाहीत. शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आज किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या आणि इतर राज्य मंत्रिमंडळातील अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थिमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; ‘या’ नेत्याचं खुलं आवाहन

दरम्यान, शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावरील भवानी मातेची पूजा देखील करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहेत. उदयनराजेंनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावं यासाठी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमनातरी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु होते. मात्र उदयनराजेंनी याला प्रतिसाद दिला नाही.

सावधान! दुधाच्या पॅकेट मध्ये सापडले झुरळ; संबंधित कंपनीवर होणार कारवाई

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *