
राज्यात सध्या हिवाळी अधिवेशनाची चर्चा सुरू आहे. संसदीय हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. यानंतर आजपासून नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळे राजकीय पक्ष यानिमित्ताने एकत्र येणार असल्याने हे अधिवेशन वादळी (Winter session) होणार आहे. यात शंका नाही. विरोधकांनी या अधिवेशनाची जय्यत तयारी केली असून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडे भरपूर मुद्दे आहेत.
मोठी बातमी! बारामतीमध्ये कोयते आणि तलवार वापरून राडा करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समोरासमोर येणार आहेत. मूळ शिवसेनेला धक्का देऊन एकनाथ शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे व ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचले होते. राज्यात ठाकरे व शिंदे गटाकडून रोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही महत्त्वाचे नेते समोर येणार आहेत. त्यामुळे आजच्या हिवाळी अधिवेशनात काय राडा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पट्ठ्याने कमालच केली! लाल केळीचा यशस्वी प्रयोग, लाखोंचं उत्पन्न
दरम्यान या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यासोबतच पत्रकार परिषद व इतर सोपस्कर देखील झाले आहेत. राज्यात सीमावाद, बेरोजगारी हे मुद्दे सध्या विरोधी पक्षाने उचलून धरलेले पहायला मिळत आहेत. याशिवाय महापुरुषांबद्दल केली जाणारी चुकीची वक्तव्ये यामुळे ठिकठिकाणी मोर्चे व आंदोलने सुरू आहेत. या अधिवेशनात हे मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता अधिक आहे.
धक्कदायक! पळून गेलेल्या पोटच्या मुलीला बापानेच लटकवलं फासावर