
पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे ( Assembly Elections) वारे जोरदार वाहत आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे भाजप तर दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये तर प्रचारादरम्यान चांगलीच चढाओढ लागली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता दोन्ही मतदार संघातील प्रचार संपणार आहे. दरम्यान काल (दि.23) उद्धव ठाकरे यांनी कसबा-चिंचवड मधील मतदारांशी ऑनलाइन संवाद साधला. यामध्ये त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शेळ्या मेंढ्यांच्या मागे फिरणाऱ्या 80 वर्षाच्या आजींनी विठुरायाच्या चरणी अर्पण केले चक्क लाखो रुपये!
भाजपने आतापर्यंत ‘वापरा आणि फेकून द्या’ हे धोरण अवलंबले आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर भाजपने टिळक कुटु्ंबीयांना वापरून त्यांना फेकून दिले. त्यामुळे भाजपला सहानुभूती दाखवायची गरज नाही. भाजपची पाशवी पकड फेकण्याची सुरुवात याच पोटणीवडणुकीपासून करा. कदाचित राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
आमच्यासोबत आलात तर तुम्ही चांगले आणि आमच्या विरोधात गेलात तर तुरुंगात जाचाल. आमच्या विरोधात आलात तर चौकशी आणि भाजपविरोधात आले तर स्वच्छ कारभार ! असेच भाजपचे धोरण आहे आणि हेच धोरण ठसवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. दरम्यान भाजपच्या काही नेत्यांनी स्वपक्षीय नेत्यांनासुद्धा सोडले नाही. त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला गेला आहे. ही चुकीची वृत्ती गाडायची असून पिंपरी आणि चिंचवडपासून सुरू करायला हवी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विजयी करावेच लागेल असे आवाहन उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी केले आहे.