कांदा प्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “कांद्याला किती खोके…”

Uddhav Thackeray attacked the government on onion issue; Said, "How many boxes for onion..."

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. नंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यांनतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली. अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होत आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

TMKOC आता मोठ्या पडद्यावर, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा!

यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. हे काय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे. असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर सुहास कांदे यांच्यावर टीका करताना त्यांनी कांद्याला किती भाव मिळाला असं म्हणत कांद्याला किती खोके मिळाले असा टोला देखील लगावला आहे.

“तुम्ही नाव चोरलं, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला, पण…”, उद्धव ठाकरे कडाडले

उद्धव ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका करताना खोक्यांचा उल्लेख केल्याने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हे खोक्यांच राजकारण तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मविआ विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *